लोकसंख्येची वाढ व वितरण MCQ ( Quiz ) लोकसंख्या भूगोल

लोकसंख्येची वाढ व वितरण MCQ ( Quiz ) लोकसंख्या भूगोल –लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे घटक – त्या मधे प्राकृतिक घटक, आर्थिक घटक, सांस्कृतिक घटक, धार्मिक घटक, सामाजिक घटक, राजकीय घटक, ऐतिहासित घटक इत्यादी वरील सर्व घटक लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारतात ज्या प्रदेशांत मानवी वस्तीला अनुकूल परिस्थिती असते, अशा प्रदेशांत लोकसंख्या दाट आढळते. याउलट, ज्या प्रदेशांत मानवी वस्तीला फारशी अनुकूल परिस्थित नसते, अशा प्रदेशांत लोकवस्ती विरळ आढळते. लोकसंख्येचे असमान वितरण हे कोणत्याही एका घटकामुळे होत नसते, तर ते अनेक घटकांच्या सामूहिक परिणामांमुळे घडून येत असते.

मुळे आज जगामध्ये लोकसंख्येचे वितरण विषम स्वरुपाचे झालेले आहे.  काही प्रदेशात दाट लोकवस्ती तर काही प्रदेशात विरळ लोकवस्ती आढळते. तर काही भागात मानव वस्ती आढ़ळत नाही तर एकाच देशाच्या विविध प्रदेशात लोकसंख्येच्या वितरणाल सारखेपणा आढळत नाही. पृथ्वी वरती उत्तर गोलार्धात लोकसंख्या 90% आढळते तर दक्षिण गोलार्धात 10% लोकसंख्या एवडेच काय तर खंडात सुद्धा वितरण विषम आहे जगाच्या एकुण लोकसंख्ये पैकी जवळ पास 60 लोक आशिया खंडात राहते या उलट आस्ट्रेलिया मधे सर्वात कमी लोकसंख्या आहे अशाप्रकारे लोकसंख्ये चे वितरण विषम स्वरुपाचे आढळते.

1 ) भौगोलिक घटक किवा प्राकृतिक घटक (Physical Factor) कोणत्याही प्रदेशातील भौगोलिक घटकांचा लोकसंख्येच्या वितरणावर फार मोठा प्रभाव पडतो. अनुकूल भौगोलिक परिस्थिती असलेल्या प्रदेशात लोकसंख्या दाट आणि प्रतिकूल भौगोलिक परिस्थिती असलेल्या प्रदेशात लोकसंख्या विरळ आढळते. यात भूरचना, पाणी पुरवठा, हवामान, जमीन, खनिजसंपत्ती व नैसर्गिक वनस्पती या भौगोलिक घटकांचा समावेश होतो.

अ) भूपृष्ठरचना किवा प्राकृतिक रचना (Relief)

पृथ्वीची भूरचना सर्वत्र सारखी नाही. स्थानपरत्वे भूराचनेत भिन्नता आढळते. भूरचना किंवा प्राकृतिक रचनेचा लोकसंख्येच्या वितरणावर फार मोठा परिणाम होतो. कारण पृथ्वीचा काही भाग पर्वतीय, काही भाग पठारी, तर काही मैदानी आहे. या भूपृष्ठ रचनेचा लोकसंख्येच्या वितरणावर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम होतो. अनुकूल मैदानी प्रदेश असलेल्या प्रदेशात लोकसंख्या दाट आणि प्रतिकूल पर्वतीय प्रदेशात लोकसंख्या विरळ आढळते.

I ) पर्वतीय प्रदेश (Mountains)

पर्वतीय प्रदेशाची भूरचना मानवी वसाहतीच्या दृष्टीने अनुकूल नसते. कारण अतिशय ओबडधोबड भूपृष्ठ रचना, तीव्र उताराचे भाग, जास्त उंची, खडकाळ जमीन, घनदाट जंगले, हवेची कमतरता इत्यादी मुळे भौगोलिक परिस्थितीचा प्रभाव लोकसंख्येच्या वितरणावर होत असतो. प्रदेशानुसार भौतिक परिस्थितीत भिन्नता आढळते व त्याचा परिणाम लोकसंख्येच्या वितरणावर होतो. पर्वतीय प्रदेशात शेती, उद्योगधंदे, वाहतुक, दळणवळण व व्यापार याची प्रगति झालेली नसते त्यामुळे लोकसंख्ये ला या ठिकाणी उप जिविकेचा चा प्रश्न सुटत नसतो त्या मुळे या भागात लोकसंख्या विरळ आढळते. जसे उत्तर अमेरिकेतिल रोकी पर्वत, द. अमेरिकेतील अंडीज पर्वत, हिमालय पर्वत, आल्प्स पर्वत, इत्यादी पर्वतीय भागात लोकसंख्या विरळ आढळते.

जगातील सर्वच उंच पर्वतीय प्रदेश मानवी वसाहतीस प्रतिकूल आहेत असे नाही. काही पर्वतीय प्रदेशात वातसन्मुख उतारावर पावसाचे प्रमाण जास्त असल्याने उतारावर व लगतच्या पायथ्यामध्ये शेती करता येते. काही पर्वतीय प्रदेशामध्ये खनिजे आढळून आल्यास औद्योगिक विकसाला चालना मिळते. उदा. यू. एस.ए. पूर्व भागातील अॅपलेशियन पर्वतात दगडी कोळसा, खनिज तेल व लोह खनिज साठे सापडल्याने या भागाचा औद्योगिक विकास होऊन तेथे लोकसंख्या केंद्रित होत गेली.

जगातील लोकसंख्येच्या असमान वितरणावर परिणाम करणारे घटक जे आहेत भूरचना, मृदा, हवामान, वनस्पती, पाणी पुरवठा, खनिज संपदा इत्यादी .

Welcome to your लोकसंख्येची वाढ व वितरण MCQ ( Quiz )

1. जगाची एकुण लोकसंख्या किती आहे?

2. जगाच्या एकुण लोकसंख्ये पैकी भारतात किती % लोक राहतात? ( 2024 नुसार )

3 . इ. स. 0001 साली जगाची लोकसंख्या किती होती ?

4 . खालील पैकी कोणते लोकसंख्या वाढची कारणे आहेत ?

5 . खालील पैकी लोकसंख्या वितरनावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक कोणती ?

6 . खालील पैकी लोकसंख्या वितरनावर परिणाम करणारे आर्थिक घटक ओळखा ?

7 . जगात लोकसंख्येचे वितरण विषम आहे तर उत्तर गोलार्धात किती % लोकसंख्या राहते ?

8 . खाली दिलेल्या पर्याया पैकी जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेला खंड कोणता ?

9 . दाट लोकवस्तीचे प्रदेश कोणती आहेत ?

10 . लोकसंख्या देशातील उपलब्ध साधन संपत्तीपेक्षा कमी असते तेव्हा त्या लोकसंख्येस काय म्हणतात ?

11 . लोकसंख्या देशातील उपलब्ध साधन संपत्तीपेक्षा जास्त असते तेव्हा त्या लोकसंख्येस काय म्हणतात ?

12 . देशातील उपलब्ध साधन संपत्ती लोकसंख्येस पुरेशी असते तेव्हा त्यास कोणती लोकसंख्या म्हणतात.

13 . खालील पैकी माध्यम लोकसंख्या असलेले प्रदेश कोणती नाहीत ?

14 . भारताची लोकसंख्यावाढ कोणत्या दशकात कमी झाली ?

15 . भारताची लोकसंख्यावाढ कोणत्या दशकात सर्वाधिक झाली ?

लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे घटक

2 thoughts on “लोकसंख्येची वाढ व वितरण MCQ ( Quiz ) लोकसंख्या भूगोल”

Leave a Comment

error: Content is protected !!