लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे घटक – त्या मधे प्राकृतिक घटक, आर्थिक घटक, सांस्कृतिक घटक, धार्मिक घटक, सामाजिक घटक, राजकीय घटक, ऐतिहासित घटक इत्यादी वरील सर्व घटक लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारतात मुळे आज जगामध्ये लोकसंख्येचे वितरण विषम स्वरुपाचे झालेले आहे. काही प्रदेशात दाट लोकवस्ती तर काही प्रदेशात विरळ लोकवस्ती आढळते. तर काही भागात मानव वस्ती आढ़ळत नाही तर एकाच देशाच्या विविध प्रदेशात लोकसंख्येच्या वितरणाल सारखेपणा आढळत नाही. पृथ्वी वरती उत्तर गोलार्धात लोकसंख्या 90% आढळते तर दक्षिण गोलार्धात 10% लोकसंख्या एवडेच काय तर खंडात सुद्धा वितरण विषम आहे जगाच्या एकुण लोकसंख्ये पैकी जवळ पास 60 लोक आशिया खंडात राहते या उलट आस्ट्रेलिया मधे सर्वात कमी लोकसंख्या आहे अशाप्रकारे लोकसंख्ये चे वितरण विषम स्वरुपाचे आढळते.
1 ) भौगोलिक घटक किवा प्राकृतिक घटक (Physical Factor) कोणत्याही प्रदेशातील भौगोलिक घटकांचा लोकसंख्येच्या वितरणावर फार मोठा प्रभाव पडतो. अनुकूल भौगोलिक परिस्थिती असलेल्या प्रदेशात लोकसंख्या दाट आणि प्रतिकूल भौगोलिक परिस्थिती असलेल्या प्रदेशात लोकसंख्या विरळ आढळते. यात भूरचना, पाणी पुरवठा, हवामान, जमीन, खनिजसंपत्ती व नैसर्गिक वनस्पती या भौगोलिक घटकांचा समावेश होतो.
i ) स्थान (Location)
स्थान हा लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारा आधारभूत घटक आहे.
त्या मधे खंडांतर्गत स्थान -(Continental Location) खंडांतर्गत स्थान मानवी वसाहतीच्या दृष्टीने गैरसोयीचे असते. खंडांतर्गत प्रदेशामध्ये हवामान विषम असते. समुद्राकडून येणारे बाष्पयुक्त वारे किनारपट्टीवर आडवे जातात. जेव्हा खंडांतर्गत प्रदेशामध्ये येतात तेव्हा त्यांच्यामधील बाष्पाचे प्रमाण कमी झालेले असते. यामुळे पडणारे पर्जन्य अत्यल्प व अनियमित असते. कमी पर्जन्यामुळे शेती विकासावर मर्यादा पडतात. मासेमारी, जहाजबांधणी, नौकायान, सुती वस्त्रोद्योग व रासायनिक उद्योग यांचा खंडांतर्गत स्थान असल्याने विकास होऊ शकत नाही तर आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी शेजारील देशांवर अवलंबून राहावे लागते. दोन शेजारील देशांमध्ये युद्ध भडकल्यास युद्धाचे परिणाम संबंध नसतांनाही खंडांतर्गत स्थान असलेल्या देशाला भोगावे लागतात. समुद्रकिनाऱ्यसंबंधित असलेले कोणतेही फायदे खंडांतर्गत स्थान असलेल्या प्रदेशातील लोकांना मिळू शकत नाही.
सागरी सान्निध्य (Insular Location) असलेल्या प्रदेशामध्ये लोकवस्ती अतिशय दाट असते. सागरी स्थान असल्याने हवामान सम, उबदार व आल्हाद दायक असते. पर्जन्याची नियमितता व मुबलकते मुळे शेती व एकूण कृषी विकासाला वाव मिळतो. त्यामुळे प्रदेशाची पर्यावरणीय पोषण क्षमता अधिक राहते. शिवाय पर्यायी अन्न म्हणून माशांचा वापर होत असल्याने अन्नधान्य उत्पादनावर ताण पडत नाही, सागरी सान्निध्यामुळे सुती वस्त्रोद्योग, मासेमारी, मीठगृहे, जहाजबांधणी व रासायनिक कारखाने यांच्या विकासाला चालना मिळते. दंतूर किनारे, खाड्या व नदी मुखामुळे अनेक नैसर्गिक बंदरांचा विकास होतो. तेथे आंतरराष्ट्रीय व्यापार वाढून हा व्यापार सागरी वाहतुकीने केला जातो. सागरी वाहतूक सुलभ व कमी खर्चिक असल्याने जड वस्तूंची वाहतूक करता येते. बंदरावरील उद्योग व वाहतूक व्यवस्थेची गरज म्हणून व्यापारी केंद्रे, व्यापारी कचेऱ्या, आरामगृहे, उपाहारगृहे, पर्यटन व मनोरंजनाची केंद्रे या तृतीय व्यवसायांचा विकास होत आहे.
ii ) भूपृष्ठरचना किवा प्राकृतिक रचना (Relief)
पृथ्वीची भूरचना सर्वत्र सारखी नाही. स्थानपरत्वे भूराचनेत भिन्नता आढळते. भूरचना किंवा प्राकृतिक रचनेचा लोकसंख्येच्या वितरणावर फार मोठा परिणाम होतो. कारण पृथ्वीचा काही भाग पर्वतीय, काही भाग पठारी, तर काही मैदानी आहे. या भूपृष्ठ रचनेचा लोकसंख्येच्या वितरणावर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम होतो. अनुकूल मैदानी प्रदेश असलेल्या प्रदेशात लोकसंख्या दाट आणि प्रतिकूल पर्वतीय प्रदेशात लोकसंख्या विरळ आढळते.
I ) पर्वतीय प्रदेश (Mountains)
पर्वतीय प्रदेशाची भूरचना मानवी वसाहतीच्या दृष्टीने अनुकूल नसते. कारण अतिशय ओबडधोबड भूपृष्ठ रचना, तीव्र उताराचे भाग, जास्त उंची, खडकाळ जमीन, घनदाट जंगले, हवेची कमतरता इत्यादी मुळे भौगोलिक परिस्थितीचा प्रभाव लोकसंख्येच्या वितरणावर होत असतो. प्रदेशानुसार भौतिक परिस्थितीत भिन्नता आढळते व त्याचा परिणाम लोकसंख्येच्या वितरणावर होतो. पर्वतीय प्रदेशात शेती, उद्योगधंदे, वाहतुक, दळणवळण व व्यापार याची प्रगति झालेली नसते त्यामुळे लोकसंख्ये ला या ठिकाणी उप जिविकेचा चा प्रश्न सुटत नसतो त्या मुळे या भागात लोकसंख्या विरळ आढळते. जसे उत्तर अमेरिकेतिल रोकी पर्वत, द. अमेरिकेतील अंडीज पर्वत, हिमालय पर्वत, आल्प्स पर्वत, इत्यादी पर्वतीय भागात लोकसंख्या विरळ आढळते.
जगातील सर्वच उंच पर्वतीय प्रदेश मानवी वसाहतीस प्रतिकूल आहेत असे नाही. काही पर्वतीय प्रदेशात वातसन्मुख उतारावर पावसाचे प्रमाण जास्त असल्याने उतारावर व लगतच्या पायथ्यामध्ये शेती करता येते. काही पर्वतीय प्रदेशामध्ये खनिजे आढळून आल्यास औद्योगिक विकसाला चालना मिळते. उदा. यू. एस.ए. पूर्व भागातील अॅपलेशियन पर्वतात दगडी कोळसा, खनिज तेल व लोह खनिज साठे सापडल्याने या भागाचा औद्योगिक विकास होऊन तेथे लोकसंख्या केंद्रित होत गेली.
याबरोबरच भारतामध्ये आसाम राज्यात खनिज तेलाच्या खाणी आढळून आल्याने प्रदेश दुर्गम असूनही तेथे लोकसंख्या केंद्रित स्वरूपामध्ये वाढत गेली. पर्वतीय प्रदेशात जलविद्युत निर्मितीला वाव असलेली जलविद्युत केंद्रे उभारल्याने अशी केंद्रे औद्योगिक वसाहतीला प्रेरक ठरतात. तेव्हा अशा प्रदेशामध्ये लोकसंख्येची घनता वाढत जाते. याशिवाय पर्यटन केंद्र व बर्फावरील क्रीडा क्षेत्र म्हणून पर्वतीय प्रदेश विकसित झाल्याने ते मानवी आकर्षणाचे केंद्र ठरते. उदा. हिमालय, आल्पस, उटी, महाबळेश्वर इ. पर्वतीय प्रदेश. इ.
II) पठारी प्रदेश (Plateau Regions)
पठारी प्रदेश मानवी वसाहतीस पर्वतीय प्रदेश तुलनेत अनुकूल समजले जातात परंतु पठाराची उंची, भूपृष्ठरचना, हवामान, मृदा, नैसर्गिक वनस्पती व पाणीपुरवठा इ. घटकांवर लोकसंख्येचे वितरण अवलंबून असते. जसे तिबेटचे पठार अति उंच व शीत आहे तसेच कोलोरॅडो पठार रेतीयुक्त असल्याने लोकवसाहतीस प्रतिकूल आहे. तर जगातील इतर पठारी प्रदेश नैसर्गिक साधनसंपत्तीच्या उपलब्धतेमुळे मानवी वसाहतीस अनुकूल ठरलेले आहेत.
जसे भारतामधेले छोटा नागपूरचे पठार खनिज साठ्यांच्या उपलब्धतेमुळे याठिकाणी मानवी वसाहतिस वाढ होते व महाराष्ट्रातील दख्खनचे पठार लाव्हा रसापासून तयार झालेल्या सुपीक रेगूर मृदा मुळे औद्योगिक व कृषी विकासाला वरदान ठरले आहेत.ऑस्ट्रेलियाच्या पठारावर सोने ( कालगुर्डी कलगुर्डी ) खनिज संपत्तीचे मोठी साठे आढळून आल्याने मुळे खाण व उद्योग यांच्या विकासाला चलाना मिळाली आहे या पठारी प्रदेशामध्ये लोकसंख्येचे केंद्रीकरण होत आहे.काही नैसर्गिक घटकांच्या उपलब्धतेमुळे पठारी प्रदेश लोकवसाहतीस अनुकूल ठरले असले तरी लोकसंख्येचे जास्त केंद्रीकरण मैदानी प्रदेशामध्येच झालेले दिसून येते.
III) मैदानी प्रदेश (Plain Regions)
मैदानी प्रदेश मानवी जीवनासाठी सर्व जास्त अनुकूल आहेत त्यामुळे मैदानी प्रदेशांना लोकसंख्या केंद्रीकरण झाले आहे जगातील एकून लोकसंख्येपैकी जवळजवळ ७५ टक्के लोकसंख्या ही मैदानी प्रदेशात स्थायी वसाहती करून राहतात. मैदानी प्रदेश अत्यंत सुपिक, सपाट व विस्तीर्ण असतात. नद्यातील गाळांच्या संचयना पासून ते तयार झालेले असल्याने मैदानी प्रदेशातील मृदा शेतीसाठी उपयुक्त असते. याठिकाणी दर वर्षी नविन गाळ येउन साँची होतो. सपाट प्रदेशावर नद्यांचा वेग कमी होऊन पाणी भूपृष्ठावर दीर्घकाळ राहते. यामुळे भूगर्भजल पातळी वाढते. उन्हाळ्यातील पाण्याची मुबलक उपलब्धता होत राहिल्याने वर्षातून तीन पिके घेणे शक्य होते. सपाट मैदानी प्रदेश वाहतूक उद्योग व व्यापारी यांच्या विकासाला अनुकूल ठरतो.
मैदानी प्रदेश वाहतुकीच्या सुविधा प्राप्त होतात. यातून आंतरराष्ट्रीय उद्योग व व्यापार यांना चालना मिळते आशिया खंडातील गंगा, सिंधू, हो-हँग हो, यांगत्से, इरावती, युरोप खंडातील हाईन, येम्स, डॅन्युब, अमेरिकेतील मिसिसिपी, इजिप्तमधील नाईल नद्यांच्या त्रिभुज प्रदेशामध्ये लोकवसाहती अतिशय दाट आहेत. ठराविक नैसर्गिक प्रतिकूलतेचे मैदानी प्रदेश मात्र लोकवसाहतीच्या घनतेवर मर्यादा पाडतात. कॅनडा व सैबेरियाच्या उत्तर मैदानी प्रदेशातील अति उष्ण व शुष्क वाळवंटी हवामान, दक्षिण अमेरिकेतील अमेझॉन व आफ्रिकेतील कांगो नद्यांच्या खोऱ्यात असलेले विषुववृत्तीय अति उष्ण व आर्द्र व रोगट हवामान मानवी वसाहतीस अयोग्य असल्याने या सर्व मैदानी प्रदेशामध्ये लोकसंख्या अतिशय विरळ आहे.
iii ) हवामान ( Climate )
हम्बोल्ट याने हवामान हा शब्द पहिल्यांदा वापरला आहे हवामानातील तापमान, पर्जन्य, वारे, आर्द्रता इत्यादी घटक मानवी जीवनावर परिणाम करतात. अति उष्ण व अति शीत, अति आर्द्र व अति शुष्क हवामान मानवी जीवन, वसाहत व व्यवसाय यादृष्टीने अयोग्य असतात. मानव प्राथमिक अवस्थेपासून वसाहतीसाठी प्रदेश निवडताना उपउष्ण व समशितोष्ण हवामान असलेल्या प्रदेशाची निवड करत आलेला आहे.
हवामानाचा मानवी जीवनावरील परिणाम हा घटक खुप महत्वाचा आहे. हवामानाचा केवळ कृषी व्यवसायावरच परिणाम होत नसून वाहतूक, व्यापार, मानवाचा आहार, वस्त्र, मानवी आरोग्य व कार्यक्षमता अशा मानवाच्या संबंधित सर्व घटकांवर हवामानाचा परिणाम होतो. पृथ्वीवरील अनुकूल हवामान उष्णकटिबंधीय व समशीतोष्ण या भागात आहे उत्तर अक्षवृत्तीय पट्ट्यातील युरोपचा पश्चिम भाग, कॅनडाचा आग्नेय भाग, आशिया खंडाचा दक्षिण, आग्नेय व पूर्व भागात लोकसंख्या जास्त केंद्रित झालेली आहे.
या उलट सहारा, कलहरी, सौदी अरेबिया, पश्चिम व मध्य आशियातील वाळवंटी प्रदेशातील उष्ण तापमान व पर्जन्याच्या अभावामुळे अतिशय विरळ वस्तीचे व निर्मनुष्य आहेत.तर अति शीत प्रदेशात जसे ग्रीनलँड, उत्तर सैबेरिया, उत्तर कॅनडा, युरोपचा उत्तर भाग व अंटार्क्टिका सतत हिमाच्छादित असल्याने निर्मनुष्य आहेत. अशा प्रकारे हवामानाचा लोकसंख्या वितरणावर परिणाम झालेला दिसून येतो.
iv ) जलसंपदा (Water Resources)
पाणी हे जीवन आहे. नैसर्गिक वनस्पती प्राणी, मानव हे पाण्याशिवाय जगू शकत नाही. मानवाला पाणी पिण्यासाठी आवश्यक असते. त्याचबरोबर मानवाच्या इतर आवश्यकता ह्या पाण्या ने पूर्ण करतात जसे शेती, उद्योग, वाहतूक इत्यादींसाठी पाण्याची उपलब्धता गरजेचे असते. मानवी स्थिरतेचा व विकासाचा आधार पाहिल्यानंतर असे निदर्शनास येते की, प्राचीन मानव जेथे जास्त पाण्याची उपलब्धता आहे अशा सरोवर, तलाव, झरे व नद्यांच्या किनारी भागात स्थिर झालेला आहे. भारतातील सिंधू, गंगा, इजिप्तमधील नाईल, उत्तर अमेरिकेतील मिसिसिपी, युरोप खंडातील डॅन्यूब, हाईन नदी, चीनमधील हो-हँग-हो नदी या सर्व नद्यांच्या प्रदेशामध्ये प्राचीन मानवी संस्कृतीचा उगम व विकास झालेला आहे. आजही जगातील नद्यांच्या प्रदेशामध्ये लोकसंख्या दाट असल्याचे दिसून येते. पाण्याची उपलब्धता असणाऱ्या प्रदेशातील शेतीविषयक पोषण क्षमता जास्त असते तेव्हा या दोन्ही घटकांचा विकास उद्योग, व्यापार व दळणवळण यांच्या प्रगतीला चालना देणारा ठरतो. उंचसखल रचना असलेल्या प्रदेशात पाण्याचा नियमित पुरवठा होत असेल तर जलविद्युत निर्माण करून औद्योगिक विकास साध्य करता येतो.
v ) मृदा (Soil)
भूपृष्ठावरील मातीच्या पातळ थरास मृदा असे म्हणतात. शेती व त्या संबंधित कामांसाठी सुपिक जमीन महत्वाची असते म्हणून जय प्रदेशात सुपिक गाळाची असते.ज्या ठिकाणी शेती व्यवसाय केला जातो. मृदा हा लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारा एक प्रभावी घटक आहे. सुपीक जमीनिवर पिके व पिकांवर मानवी व प्राणी जीवन अवलंबून असते. म्हणून जेथे शेतीचा विकास होतो तेथे शेतीवर आधारित उद्योगधंद्यांचा विकास होतो, सहाजिकच अशा भागात लोकसंख्येची दाटी आढळते. उदा. नद्यांच्या खोऱ्यात गाळाची सुपीक जमीन असते. म्हणून नद्यांच्या खोऱ्यात शेती आणि शेतमालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांचा विकास होतो. त्यामुळे नद्यांच्या खोऱ्यात लोकसंख्येची घनता जास्त असते. उदा. गंगा, सिंधू, इरावती, याँगत्सि, सिकँग, मिसिसिपी, नाईल, मेनाम, मेकांग इत्यादी नद्यांची खोरी सुपीक जमीनीमुळे दाट लोकवस्तीचीबनली आहेत. तसेच भारतातील दक्खनचे पठार व जावा बेटावर सुपीक जमिनीमुळे लोकसंख्या दाट आहे. याउलट जांभ्या रंगाची रेताड जमिनीचे भाग, डोंगराळ, वाळवंटी व ओसाड जमिनीचे भाग शेतीसाठी अयोग्य असल्याने तेथेलोकसंख्या खूपच विरळ आहे.
vi )नैसर्गिक वनस्पती (Natural Vegetation)
आदि मानव अवस्थेपासून मानव जंगलात गुहेत राहत आलेला आहे. जंगलातील नैसर्गिक वनस्पतींचे वर आपले उपजीविका भागवत होता कालांतराने मानवाने निरीक्षण करून शेती ही कला अवगत केली. शेती विकासामुळे मानवी समूह व जंगले यांच्यातील अंतर वाढत गेले; परंतु जंगलांच्या उपयुक्ततेपासून मानव दुरावू शकला नाही. आदिमानवासाठी अन्न, वस्त्र व निवारा या तिन्हींची उपलब्धता असणारे क्षेत्र म्हणून जंगलाकडे पाहिले जात असे. आजही जंगलातून लाकूडतोड, डिंक व मध प्राप्त करणे, औषधी वनस्पती व मसाल्याचे पदार्थ गोळा करणे, इंधन म्हणून लाकूड गोळा करणे यासारखी प्राथमिक स्वरूपाची कार्ये काही प्रमाणात व्यवसाय म्हणून केले जातात. बदलत्या परिस्थितीनुसारदेखील जंगलांचे महत्त्व कमी झालेले नाही. कागद उद्योग, आगपेटी, उद्योग याासाठी कच्च्या माल म्हणून तर फर्निचर, इमारती बांधकाम, रेल्वे स्लीपर्स, शेती अवजारे, खेळण्या व खेळाचे साहित्य तयार करण्यासाठी जंगलातील गवत व लाकडांचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो. वातावरणामध्ये आर्द्रता टिकवणे, जमिनीची धूप रोखणे, भूगर्भजल पातळी उंचावणे व पर्यावरणाचे संतुलन ठेवणे असा नैसर्गिक कार्यामध्ये वनस्पतींची महत्त्वपूर्ण भूमिका असते. या उपयोगितेमुळे नैसर्गिक वनस्पती असलेल्या प्रदेशामध्ये लोकवस्ती जास्त आढळते.
मोसमी वने, भूमध्यसागरी वने, पश्चिम युरोपीय वने, सेंट्र लॉरेन्स, पूर्व व आग्नेय आशियातील वने ही मध्य स्वरूपाची उपयुक्त वने असल्याने या वनांच्या प्रदेशात लोकवस्ती जास्त प्रमाणात आढळते. काही अपवाद सोडलातर विषुववृत्तीय आफ्रिकेतील कांगो, दक्षिण अमेरिकेतील अमेझॉन नदीचे खोरे व न्यूगिनी प्रदेशामध्ये घनदाट सदाहरित वने. विषुववृत्त च्या दरम्यान घनदाट अरण्य असल्यामुळे हा प्रदेश निर्मनुष्य म्हणून ओळखला जातो.
vii )खनिजे (Minerals)
खनिज संपत्तीचे अनन्य साधारण असे महत्त्व आहे. लोह खनिज, खनिज तेल, दगडी कोळसा, मॅग्नीज, तांबे, बॉक्साईट, नैसर्गिक वायू ही शक्तिसाधने औद्योगिकरण झालेले प्रदेश जास्त लोकसंख्येला सामावून घेऊ शकतात. त्यामुळे लोकसंख्येची घनता औद्योगिक क्षेत्रात सतत वाढत जाते. यू. एस. ए. च्या पूर्व भागातील व पंचमहा सरोवराच्या प्रदेशातील लोह खनिज, दगडी कोळसा, खनिज तेल उत्पादन क्षेत्र, ब्रिटनमधील कोळसा क्षेत्र, रशियातील डोनेट व कुझनेट क्षेत्र, जर्मनीतील हूर दगडी कोळसा उत्पादक क्षेत्र हे दाट लोकवस्तीचे प्रदेश आहेत.
जगातील काही प्रदेशात हवामान व इतर पर्यावरणीय घटक मानवी वसाहतीस पूर्णतः प्रतिकूल असूनही केवळ, खनिज संपत्तीचे मौल्यवान साठे आढळून आल्याने तेथे मानवी वसाहती स्थिर होऊ लागल्या. याचे उल्लेखनीय उदाहरण म्हणजे ऑस्ट्रेलियातील सोन्याच्या खाणी असलेले कालगुर्डी व गुलगार्डी वाळवंटी प्रदेशात लोकवसाहती वाढत आहेत.
तसेच दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग व किंबलें हे कलहरी वाळवंटातील प्रदेश असून येथे सोन्याच्या व हिऱ्यांच्या खाणी आढळून आल्यानंतर, पूर्ण प्रदेश लोकवसाहतीचे केंद्र बनला आहे. सौदी अरेबिया, इराण, इराक, कुवैत देशांत अरेबियाचे वाळवंट आहे; परंतु खनिज तेलाचे विपुल साठे आढळल्याने उष्ण व शुष्क वाळवंटी प्रदेश असूनही प्रदेशात लोकवसाहती मध्ये वाढ होत आहे.
2) आर्थिक घटक (Economic Factors)
भौगोलिक घटकांप्रमाणे लोकसंख्येच्या वितरणावर आर्थिक घटकाचा परिणाम होतो. हे घटक मानवनिर्मित व मानवाशी संबंधित असतात. त्यामुळे लोकसंख्येच्या वितरणावर जास्तीत जास्त परिणाम करतात. आर्थिक घटकामध्ये औद्योगिक विकास, वाहतुक व दळणवळणाची साधने, खनिजांचे उत्खनन, जलसिंचनाची साधने, नागरीकरण हे प्रमुख घटक आहेत.
अ) औद्योगिक विकास (Industrial Development)
खनिजांच्या उत्खननामुळे निरनिराळ्या उद्योगांचा विकास होतो तेथे अनेक कुशल, अकुशल मजुरांची आवश्यकता असते. अशा मला ठिकाणी रोजगाराच्या अपेक्षेने लोक बाहेरून येउन राहतात. कालांतराने अशी ठिकाणे औद्योगिक क्षेत्रे म्हणून उदयास येतात व विकसित होतात. अशा भागात लोकसंख्या दाट असते. म्हणजेच लोकसंख्येची घनता जास्त असते. उदा. प. बंगाल, बिहार, पुणे-मुंबई औद्योगिक पट्टा, ग्रेटब्रिटन मधील मँचेस्टर क्षेत्र, प. जर्मनीतील रूह प्रदेश इत्यादी, तसेच स. संस्थानच्या ईशान्य भागात औद्योगिक प्रगतीमुळे लोकसंख्येची घनता जास्त आहे. एकंदरीत औद्योगिक विकास झालेला क्षेत्रात लोकसंख्या जास्त आहे.
ब) वाहतुक साधने
नद्या, समुद्रमार्ग ही मानवाला लाभलेली एक नैसर्गिक देणगी आहे. जलमार्गामुळे नवनवीन प्रदेशांचा शोध लागून आंतरराष्ट्रीय व्यापार वाढीस लागला. त्यामुळे समुद्रकिनारी बंदरांचा विकास होन तेथे लोकसंख्या वाढली. एकंदरीत दळणवळण व वाहतुकीच्या साधनांचा परिणाम लोकसंख्येच्या वितरणावर होतो.
ब) खनिजे व ऊर्जा साधनांचे उत्खनन (Extraction of Minerals and Power Resources)
खनिजे व ऊर्जा साधने ही एक महत्वाची नैसर्गिक साधन संपत्ती आहे. याचे उत्खनन झाल्यावर त्यांचे आर्थिक घटकांत रूपांतर होते. यात लोहखनिज, मंगलधातू, द. कोळसा, सोने, हिरे, खनिजतेल याशिवाय इतर अनेक धातूंचे उत्खनन महत्त्वाचे असते. खनिजांच्या उत्खणणाने खाणकाम व उद्योगधंद्यांची प्रगती होते. अशा भागात लोकसंख्या जास्त असते. उदा. भारतातील प. बंगाल व झारखंडमधील खनिजतेल क्षेत्रे, प. जर्मनीतील क्रूर प्रदेश, संयुक्त संस्थानातील अॅपेलेशियन प्रदेश व ईशान्य भाग, रशियातील डोनेट प्रदेश इत्यादी.
ड) जलसिंचनाची साधने (Means of Irrigation)
जलसिंचनाच्या साधनांत धरणे, कालवे, तलाव ही प्रमुख साधने आहेत. जेथे या साधनांची प्रगती होते तेथे शेतीचा विकास होऊन अन्नधान्य व इतर कृषिमालाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होऊ लागते. यासाठी मनुष्य वर्षभर पाणी उपलब्ध असलेल्या नदी, कालवे, सरोवरे, विहरी, तलाव व ओढ्यांच्या काठी वस्ती करून राहतो. नद्यांतून पाण्याचा धरणे व कालव्यामार्फत वर्षभर मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा होतो. त्यामुळे नद्यांच्या खोऱ्यात दाट लोकवस्ती असते. उदा. भारतातील गंगा, सिंधू, इरावती, चीन मधील हो ह्यांग हो, यांगत्सी, सिकंग, मेनाम, मेकांग, आफ्रिकेतील नाईल, उ. अमेरिकेतील मिसिसिपी इत्यादी नद्यांच्या खोऱ्यात लोकसंख्येची घनता जास्त आहे.
स्थानिक भागात विहीर व तलाव जलसिंचनही महत्वाचे असते. अशा प्रदेशात कृषिमालावर आधारित उद्योगांचाही विकास होतो. भारतात पंजाब व हरियानात, सतलजचे खोरे, पाकिस्तानातील सिंधुचे खोरे व इजिप्तमधील नाईल नदीच्या खोऱ्यात व पंचमहासरोवराच्या भोवतालच्या भागात जलसिंचनाच्या सोईमुळे लोकसंख्या जास्त आहे.
इ) नागरीकरण (Urbanization)
शहरे ही वाहतुक, दळणवळण, व्यापार, रोजगार, शिक्षण, आरोग्य, मनोरंजन इत्यादींची केंद्रे असतात. अशा ठिकाणी लोक ग्रामीण भागातून शहरात जाऊन राहतात. अशा प्रकारे शहराकडे लोकांचे स्थलांतर होऊन शहरे वाढू लागतात. त्यामुळे नागरीकरण होऊन तेथील लोकसंख्या वाढते. उदा. मुंबई, कोलकत्ता, टोकियो, शांघाय, लंडन इत्यादी. या शहरात व त्यांच्या परिसरात लोकसंख्या जास्त असण्याचे कारण म्हणजे नागरीकरण. ज्या शहरांची वाढ होत नाही तेथे मात्र लोकसंख्या कमी असते. जगात अशी बरीच शहरे आहेत.
3 ) धार्मिक घटक (Religious Factor) धार्मिक घटकांचाही लोकसंख्येच्या वितरणावर कमी-अधिक प्रमाणात परिणाम होतो. हिंदू धर्मात लवकर विवाह करण्याची पद्धती व मुस्लिम समाजात एकापेक्षा जास्त विवाह करणे यामुळे लोकसंख्या वाढते. मुस्लीम धर्माचे लोक ज्या ज्या देशात आढळतात तेथे आजही लोकसंख्येचे प्रमाण जास्त आढळते. त्याचप्रमाणे हिंदू धर्मात धार्मिक महत्त्व प्राप्त झाल्याने तेथे अनेक लोक येऊन स्थाईक होतात. पंढरपूर, नाशिक, बनारस, हरिद्वार, मथुरा, काशी, तिरुपती यासारख्या ठिकाणी भिक्षुक व भाविक येऊन स्थायीक झाले आहेत. त्यामुळे त्या ठिकाणांचीलोकसंख्या जास्त आहे.
4 ) सामाजिक घटक (Social Factor)
Hi